टॅक्सी परवान्याबाबत घुमजाव केल्याने मुख्यमंत्र्यांवर टीका

21 जानेवारी टॅक्सी परवान्याबाबत गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी घुमजाव केलं. स्थानिक भाषेत गुजराती, हिंदी या भाषाही येतात. पण त्याचा चुकीचा अर्थ लावत मराठी भाषाच आली पाहिजे यावर चर्चा झाली. असं घुमजाव मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे. आणि दिवसभर यावर प्रतिक्रिया उमटल्या. टॅक्सी परवान्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या दबावाखाली घुमजाव केल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय लाचार मुख्यमंत्री एकटेच कसा बदलू शकतात ? असा सवालही राज ठाकरे यांनी केला. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार टॅक्सी परवाने देण्याबाबत मराठीच्या मुद्यावर ठाम असल्याचं उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं. इतर भाषा आल्या तर उत्तम मात्र मराठी येणं आवश्यक असल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. तर 'मी महाराष्ट्र शासनाचा निर्णय वाचला नसला, तरी भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात गैर काय?' असा सवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला. तसंच अमराठी टॅक्सीवाल्यांना मराठी शिकवलं जाऊ शकतं असंही ते पुढे म्हणाले. टॅक्सी परवाने भूमिपुत्रांना कि इतर भाषिकांनाही या मुद्यावर गुरुवारी राजकारणाने वेग घेतला.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2010 01:48 PM IST

ताज्या बातम्या