'नाम'ने घेतलं गाव दत्तक !

'नाम'ने घेतलं गाव दत्तक !

  • Share this:

NAM

02 ऑक्टोबर : नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंनी स्थापन केलेल्या नाम संस्थेनं औरंगाबाद जिल्ह्यातील धोदंलगाव दत्तक घेतलं आहे. गांधी जंयतीनिमित्त घेण्यात आलेल्या ग्रामसभेत नाना आणि अनासपुरेंनी तशी घोषणा केली.

आगामी काळात दुष्काळ निर्मुलन, ग्रामीण विकासासोबतच गाव आणि शहरांमध्ये सुसंवाद घडवून आणण्याचे उद्दीष्टही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच जलसंधारण आणि शेतीविकासासाठी काही प्रयोगही करण्यात येणार आहे. धोदंलगावच्या विकासासाठी कुणी बाहेरून येणार नाही. आपल्यालाच गावाचा विकास साधायचा आहे अशा शब्दात नाना आणि मकरंद यांनी गावकर्‍यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर कोणतही राजकारण न करता सर्वांनी मिळून या कामात सहभागी व्हावं असं आवाहन नाना पाटेकर यांनी केलं. नामला मिळणार्‍या मदतीचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून लाभार्थी शेतकर्‍यांची संख्या देखील तेवढ्याच वेगाने वाढते आहे, असं नानांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: October 2, 2015, 9:52 PM IST

ताज्या बातम्या