आधी दहशतवाद थांबवा, मगच चर्चा !, स्वराज यांनी पाकला ठणकावलं

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2015 10:24 AM IST

आधी दहशतवाद थांबवा, मगच चर्चा !, स्वराज यांनी पाकला ठणकावलं

sushma swaraj on pak02 ऑक्टोबर : पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला खतपाणी घालणं बंद करणार नाही तोपर्यंत चर्चा होऊ शकणार नाही अशा शब्दात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रात बोलताना पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय. तसंच सीमेपलीकडून अजुनही दहशतवादी पाठवले जात आहे असा आरोपही त्यांनी केला.

संयुक्त राष्ट्र सभेत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आपली बाजू मांडली. याला प्रत्युत्तर देत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला चांगलेच फैलावर घेतले. आधी दहशतवाद थांबवावा आणि चर्चा करण्यासाठी पुढे यावं. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊच शकत नाही.

मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील आरोपी अजूनही मोकाट फिरत आहे. भारताने अलीकडेच दोन जिवंत दहशतवादी पकडले आहे पण तरीही पाककडून कारवाई होत नाही अशी तीव्र नाराजी स्वराज यांनी व्यक्त केली. सीमेवर आजही पाकिस्तानकडून दहशतवादी येत असतात. सीमेलगतच्या भागात आम्ही शांततेची मागणी करतोय पण पाककडून प्रतिसाद मिळत नाही. जोपर्यंत हे थांबत नाही तोपर्यंत चर्चा होणार नाही अशा स्पष्ट शब्दात स्वराज यांनी पाकला बजावलं.

दहशतवादाचा कोणता धर्म नाही. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे. फक्त रक्तरंजीत खेळ खेळला जातोय. आंतराष्ट्रीय स्तरावर सर्वांनी एकत्र येऊन दहशतवादाविरोधात लढा दिला पाहिजे असं मतही स्वराज यांनी व्यक्त केलं.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2015 10:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...