सनातनवर मुलीचं ब्रेनवॉश केल्याचा आरोप

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2015 05:47 PM IST

Image img_12901_sanatan_final_240x180.jpg01 ऑक्टोबर : गेल्या सहा वर्षांपासून आमची मुलगी घरी आली नाही. सनातन संस्थेच्या आश्रमात आमच्या मुलीचं ब्रेन वॉश करण्यात आलं असा गंभीर आरोप राजेंद्र स्वामी यांनी केलाय.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर सनातनचा साधक समीर गायकवाड याला ताब्यात घेतलंय. त्यानंतर सनातन संस्था वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. सर्वच थरातून सनातनवर गंभीर आरोप होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अणदूर इथले राजेंद्र स्वामी यांच्या मुलीचा किस्सा असाच काही आहे.

त्यांची मुलगी सनातनची पुर्णवेळ साधक आहे. गेल्या सहा वर्षांपासून वारंवार विनंती करुनही प्रियंका घरी यायला तयार नाही अशी तिच्या वडिलांची तक्रार आहे. प्रियंका सध्या कर्नाटकच्या सनातनच्या आश्रमात मुख्य साधक म्हणून कार्यरत आहे. समीरच्या अटकेनंतर प्रियकांचे वडील पुरते धास्तावले आहेत. ब्रेनवॉश करुन आपल्या मुलीला सनातन कुठल्यातरी गुन्हात अडकवेल अशी त्यांना भीती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2015 05:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...