समीरच्या 'ब्रेन मॅपिंग' चाचणी अर्जावर आज सुनावणी

  • Share this:

sameer_gaikwad_pansarecase_arrest29 सप्टेंबर : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाडची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज पोलिसांनी कोर्टात दाखल केला असून त्यावर आज सुनावणी होणार आहे. समीरची 9 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आलीय.

पानसरे हत्येप्रकरणी समीर गायकवाडला 16 सप्टेंबरला सांगलीमधून ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला तीन वेळा अशी 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. काल सोमवारी त्याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला पुन्हा पोलीस बंदोबस्तामध्ये कोर्टात हजर केलं. पोलिसांनी काल पुन्हा समीरची पोलीस कोठडी मागितली होती. पण, कोर्टाने समीरला आता न्यायालयीन कोठडी पाठवलं. समीरला 9 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळालीय. त्यापूर्वी कोल्हापूर कोर्टात दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला. सरकार आपल्या युक्तिवादात समीर पोलिसांची दिशाभूल करत असल्याच सांगत गणेशोत्सवामुळे पोलिसांना तपासात वेळ मिळाला नाही असं सांगितलं. आणि 2 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. पण बचाव पक्षाच्या वकिलांनी 12 दिवसांत तपास पुढे सरकत नसल्याचा दावा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2015 09:54 AM IST

ताज्या बातम्या