मंगळावर पाणी सापडल्याचा 'नासा'चा दावा

मंगळावर पाणी सापडल्याचा 'नासा'चा दावा

  • Share this:

mars_nasa28 सप्टेंबर : 'मंगळग्रहावर पाणी सापडलंय !' गेली अनेक दशकंच नाही तर कित्येक शतकं माणसाच्या खगोलशास्त्रीय तसंच पौराणिक चिंतनात महत्वाचं स्थान मिळवणार्‍या मंगळ ग्रहाविषयी ही एक अतिशय महत्त्वाची माहिती अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने जाहीर केली आहे.

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने ट्विटकरून नासावर पाणी सापडल्याची घोषणा केलीये. 'नासा'च्या म्हणण्यानुसार मंगळ ग्रहावर उष्ण हवामान असणार्‍या काळात पाण्याचे ओहोळ वाहतात. हे ओहोळ मंगळ ग्रहावर शंभर मीटरहून जास्त अंतरावर वाहतात. कमी तापमानाच्या स्थितीत हे ओहोळ गोठतात. या नवीन शोधामुळे मंगळावर काही प्रमाणात जीवसृष्टी असण्याची शक्यताही 'नासा'ने वर्तवली आहे. तसंच उन्हाळ्यात मंगळावर खारट पाण्याचे ओहोळ वाहतात. आणि वर्षभरात हे ओहोळ गायब होऊन जातात असा दावाही नासाने केला.

 

आपल्या सूर्यमालेतला पृथ्वीशी सर्वात मिळताजुळता असणारा ग्रह आहे. सूर्यमालेतल्या 'हॅबिटेबल झोन' म्हणजे जीवसृष्टी निर्माण व्हायला पोषक स्थिती असणार्‍या झोनमध्ये पृथ्वीशिवाय असणारा हा एकमेव दुसरा ग्रह आहे. मंगळावर हे पाणी कुठून येतं याचं स्पष्ट कारण आता माहीत नसलं तरी मंगळाच्या पृष्ठभागाच्या खाली असणार्‍या बर्फामुळे हे पाणी वर येऊ शकतं असा अंदाज आता व्यक्त होतोय.

याआधीही असे दावे केले गेले

- मंगळावर लक्षावधी वर्षांपूर्वी पाणी होतं, असा आतापर्यंत समज होता

- सध्या फक्त मंगळाच्या दोन्ही ध्रुवांवर बर्फ आहेत, असा समज होता

- पहिल्यांदाचा द्रवरूपातल्या, वाहणार्‍या पाण्याच्या खुणा सापडल्या आहेत

- जीवसृष्टीसाठी द्रवरूपातलं पाणी आवश्यक असतं

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First Published: Sep 28, 2015 10:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading