पंतप्रधान मोदी आज घेणार ओबामांची भेट

  • Share this:

obama and modi Walking & Talking (14)28 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. आज ते अनेक जागतिक नेत्यांची भेट घेणार आहेत.न्यूयॉर्कमध्ये या सर्व भेटी होणार आहेत. मोदींचं न्यूयॉर्कला आगमनही झालं आहे. मोदी भेट घेत असलेल्या नेत्यांमध्ये सर्वात मोठं नाव आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराकओबामा यांचं. त्यानंतर मोदी फ्रांसचे अध्यक्ष फ्राँस्वा ओलांद आणि ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरूमन यांच्याशीही चर्चा करतील. विशेष म्हणजे हे तिन्ही देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे कायमस्वरुपी सभासद आहेत. आणि भारतानं अलीकडे या परिषदेत स्थान मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काही वृत्तांनुसार कॅमेरून आणि मोदींची भेट ही ऐनवेळी ठरवण्यात आली.

मोदी आज कुणाकुणाला भेटणार आहेत ?

- बराक ओबामा, अध्यक्ष, अमेरिका

- फ्राँस्वा ओलांद, अध्यक्ष, फ्रांस

- डेव्हिड कॅमेरून, पंतप्रधान, ब्रिटन

- हमाद बिन खलिफा अल थानी, कतरचे अमीर

- एन्रिके पेना निएतो, अध्यक्ष, मेक्सिको

- महमूद अब्बास, अध्यक्ष, पॅलेस्टाईन

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First Published: Sep 28, 2015 05:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading