माझ्यावर अद्याप एक रुपयाचाही आरोप नाही - मोदी

Samruddha Bhambure | Updated On: Sep 28, 2015 10:41 AM IST

माझ्यावर अद्याप एक रुपयाचाही आरोप नाही - मोदी

28  सप्टेंबर :राजकीय नेत्यांवर कोट्यवधींची माया जमावल्याचे आरोप आहेत. पण मझ्यावर अद्याप एक रुपयाचाही आरोप नाही असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी हम जियेंगे तो देश के लिये और मरेंगे तो भी देश के लिये असं म्हटलं आहे. कॅलिफोर्नियातील सॅप सेंटर इथे 18 हजार भारतीयांना उद्देशून मोदी यांनी आज (सोमवारी) भाषण केलं. मी एकेक क्षण देशासाठी कठोर परीश्रम करत आहे. मला तुमच्याकडून प्रमाणपत्र हवंय, मी मेहनत करतोय की नाही, जबाबदारी पार पाडतोय की नाही असं मोदींनी विचारताच लोकांनी "मोदी...मोदी" अशा घोषणा देत त्यांचा जयजयकार केला.

आपल्या देशात राजनेत्यांवर काही वेळातचं आरोप लागायला सुरुवात होते. याने 50 कोटी तर त्याने 100 कोटी बनवले. कोणाच्या मुलाने 150 कोटी, मुलीने 500 कोटी तर जावयाने 1000 कोटी कमावले पण माझ्यावर अशा प्रकारचा कोणता आरोप आहे का? असा सवाल करत मोदींनी मी जगणार तर देशासाठी आणि मरणार तेसुद्धा देशासाठीचं, असं म्हटलं आहे. जगात सर्वात वेगवान आर्थिक वाढ होणारा कोणता देश असले, तर तो भारत आहे आणि हे सर्वांनी मानले आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.

आज 21 वे शतक हे भारताचं असल्याचं जग मानू लागलं आहे. हा बदलाव कसा आला? हा बदलाव मोदी मोदी कारणामुळे नाही तर, सव्वाशे करोड देशवासियांच्या संकल्प शक्तीमुळे आला आहे. सव्वाशे करोड लोकांनी पण केला आहे आता देश मागे नाही राहणार. जेव्हा जनता संकल्प करते तेव्हा देवसुद्धा आशीर्वाद देतो. पूर्वी भारत जगासाठी हास्याचा विषय ठरलेला आणि आज जगासाठी केंद्रबिंदू आहे. आता वेळ बदलली असून, नव्या जगाच्या निर्मितीसाठी भारतीय समुदाय या ठिकाणाहून एक इतिहास रचत आहे.

'ब्रेन ड्रेन' म्हणून हिणवलं जाणार्‍या भारताची ओळख आज 'ब्रेन गेन' अशी झाली आहे. पण, ज्या पाण्याच्या, धर्तीच्या संस्कारांमुळे आपण इथपर्यंत पोचला आहात, ती धर्ती तुमची वाट पाहत आहे. त्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे. भारताची अर्थव्यवस्था वाढत आहे. भारताने पहिल्याच प्रयत्नात मंगळयानाचे प्रक्षेपण केले. जे आश्वासन दिले आहेत, त्याचे पूर्ण करत आहे, असे ते म्हणाले. आजचा तरुण वर्ग देशासाठी काहीतरी करण्यासाठी बैचन आहे. जग जलद गतीने बदलत आहे, त्यामुळे सर्वांनी बदलावे असं आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, उद्या मोदी संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत भाषण करणार आहेत, आणि त्याआधी त्यांनी आज संयुक्त राष्ट्रांवर सडकून टीका केली आहे. संयुक्त राष्ट्राने अद्याप दहशतवादाची नेमकी व्याख्या स्पष्ट केलेली नाही, ऐवढ्या वर्षानंतरही संयुक्त राष्ट्र व्याख्या ठरवत नसेल तर मग त्याच्याशी लढायचं कधी, असा खडा सवाल मोदींनी उपस्थित केला आहे. संयुक्त राष्ट्राने दहशतवादाबद्दलची त्यांची भूमिका, ते कोणाला दहशतवादी मानतात आणि कोणाला मानवतावादी समजतात हे, त्यांनी स्पष्ट करावं, असं ही मोदी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 28, 2015 10:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close