28 सप्टेंबर : अवघ्या जगाला कवेत घेणार्या फेसबुकच्या मुख्यालयाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. आणि ही भेट ऐतिहासिक अशीच ठरली. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठ्या आदराने स्वागत केलं. यावेळी मोदींची प्रकट मुलाखतही घेण्यात आली. झुकरबर्ग आणि मोदी यांच्या या संवादाला आठवणींची किनार लागली. आपल्या आईने भांडी घासून आणि वडिलांनी मजुरी करून आम्हाला शिकवलं अशी आठवण काढताना मोदींचे डोळे पाणावले.
फेसबुकच्या मुख्यालयात छोटेखानी झालेल्या या कार्यक्रमात फेसबुकचे जवळपास सर्वच कर्मचारी उपस्थित होते. अगोदरच पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी आतूर असल्याचं सांगत मार्क झुकरबर्गने फेसबुकवर जाहीर केलं होतं. आज त्याने आपल्या फेसबुकपेजवर तिरंगा ध्वजही लावला होता. मोदी सिलिकॉनव्हॉलीत आले असता स्वत: हजर राहुन मोठ्या अदबीने त्याने पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांची मार्क झुकरबर्गने प्रकट मुलाखत घेतली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या फेसबुक मुख्यालयात आले ही आमच्यासाठी अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे असे गौरवद्गार झुकरबर्गने काढले. या मुलाखतीत जगभरातून मागवण्यात आलेल्या प्रश्नांना मोदींनी उत्तर दिली. मोदींनी आपण मुख्यमंत्री ते पंतप्रधान कसे झालो याचा अनुभव सर्वांशी शेअर केला. या कार्यक्रमाला झुकरबर्गचे आई वडील या कार्यक्रमाला आले होते. मार्क झुकरबर्गशी बोलताना मोदी आईबद्दल भावुक झाले होते. आई वडिलांची आठवण सांगताना मोदींच्या डोळ्यात पाणी आलं. आईने भांडी घासून आणि वडिलांनी मजुरी करून आम्हाला शिकवलं अशी आठवण काढताना मोदींचं गळा भरून आलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ग्रँड अशा कार्यक्रमात पंतप्रधानांचं भावूक रुप पाहून वातावरण काही काळ स्तब्ध झालं. या कार्यक्रमानंतर मोदींनी संपूर्ण मुख्यालयाची पाहणीही केलीय.
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा