'केईएम'च्या डॉक्टरांचा संप अखेर मागे

'केईएम'च्या डॉक्टरांचा संप अखेर मागे

  • Share this:

mard strike_kem27 सप्टेंबर : रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाणीमुळे गेली दोन दिवस संपावर असलेल्या केईएम हॉस्टिपटलच्या डॉक्टरांनी अखेर आपला संप मागे घेतलाय. निवासी डॉक्टरांना मारहाण करणार्‍या चौघांनाही अटक करण्यात आलीये. त्यामुळे डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला असून आज संध्याकाळपासून कामावर रूजू होणार आहे.

दोन दिवसांपूर्वी डेंग्यू झालेली एक मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी केईएमचे निवासी डॉक्टर सुहास चौधरी, कुशल आणि पुनीत यांना लोखंडी सळ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत हे तिन्ही डॉक्टर जबर जखमी झाले होते. वारंवार रुग्णांकडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे मार्ड संघटनेनं संप पुकारला होता. शनिवारी वैद्यकीय मंत्री विनोद तावडे यांनी निवासी डॉक्टरांची भेट घेतली. केईएममध्ये सुरक्षा रक्षक तैनात करू, सीसीटीव्ही कॅमेरे लावू, खासगी बाऊंसर्स ठेवू अशी अनेक आश्वासनं तावडेंनी दिली. तसंच मारहाण करणार्‍या चारही हल्लेखोरांना अटक करण्यात येईल आणि त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करू असं आश्वासन तावडेंनी दिलं होतं. मात्र, डॉक्टरांनी लेखी आश्वासनाशिवाय संप मागे घेतला नाही. अखेर दोन दिवसांनंतर पोलिसांनी हल्ला करणार्‍या चारही आरोपींना अटक केलीये. गेल्या दोन दिवस संपामुळे रुग्णाचे हाल झाले ही परिस्थिती लक्षात घेता अखेर डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: September 27, 2015, 4:59 PM IST

ताज्या बातम्या