लेखी आश्वासनाशिवाय संप मागे नाही, केईएमचे डॉक्टर संपावर ठाम

लेखी आश्वासनाशिवाय संप मागे नाही, केईएमचे डॉक्टर संपावर ठाम

  • Share this:

kem strike26 सप्टेंबर : मुंबईच्या केईएम रुग्णालयात निवासी डॉक्टर कालपासून संपावर आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज (शनिवारी) या डॉक्टरांची भेट घेतली. सुरक्षारक्षक तैनात करू, सीसीटीव्ही कॅमेरे लावू, खासगी बाऊंसर्स ठेवू अशी अनेक आश्वासनं तावडेंनी मार्डच्या डॉक्टरांना दिली. पण लेखी आश्वासनं दिल्याशिवाय संप मागे घेणार नाही असा पवित्रा डॉक्टरांनी घेतलाय.

दोन दिवसांपूर्वी रुग्णांच्या नातेवाईकांनी केईएमच्या डॉक्टरांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीनंतर मार्डच्या डॉक्टरांनी संप पुकारला. आज संपाचा दुसरा दिवस उजाडला. या संपामुळे रुग्णांचे हाल होत आहे.

एकीकडे मारहाण प्रकरणामुळे डॉक्टरांनी संप पुकारला. तर दुसरीकडे पुन्हा एकदा काल पहाटेही केईएममध्ये एका रुग्णाच्या नातेवाईकांनी 3 निवासी डॉक्टरांवर हल्ला केला. सुदैवानं यात कुणाला गंभीर दुखापत झाली नाही.

आज वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी निवासी डॉक्टरांची भेट घेतली. केईएममध्ये सुरक्षा रक्षक तैनात करू, सीसीटीव्ही कॅमेरे लावू, खासगी बाऊंसर्स ठेवू अशी अनेक आश्वासनं तावडेंनी दिली. तसंच मारहाण करणार्‍या चारही हल्लेखोरांना अटक करण्यात येईल असंही तावडे म्हणाले. मात्र, डॉक्टरांनी लेखी आश्वासनाशिवाय संप मागे घेण्यास नकार दिलाय.

तावडेंनी डॉक्टरांना कोणती आश्वासनं दिली ?

- 32 सुरक्षा रक्षक तैनात करणार

- 30 खासगी बाऊंसर ठेवणार

- 30 सीसीटीव्ही बसवणार

- कॅमेरे बसवेपर्यंत पोलिसांची गस्त वाढवणार

- यापुढे फक्त 2 नातेवाईकांना पास देणार. त्यातली एक व्यक्ती वॉर्डमध्ये राहू शकणार

- आरोपींवर कलम 326 नुसार अजामीनपात्र गुन्हा दाखल करणार

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: September 26, 2015, 5:37 PM IST

ताज्या बातम्या