Elec-widget

राज ठाकरेंनी शेतकर्‍यांकडून मागवला अॅक्शन प्लॅन !

  • Share this:

raj thackaey pc26 सप्टेंबर : दुष्काळी परिस्थितीवर राज्य सरकार आणि राष्ट्रवादी सडकून टीका केल्यानंतर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकर्‍यांची भेट घेतली. आणि शेतकर्‍यांकडून 1 नोव्हेंबरपर्यंत अॅक्शन प्लॅन मागितला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवारी) नाशकात दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांची भेट घेतली. बराच वेळ राज यांनी बळीराजाशी चर्चा केली. तुमच्या काय मागण्या आहेत, त्याचा एक ऍक्शन प्लॅन तयार करा, आणि मला हा प्लॅन 1 नोव्हेंबरपर्यंत द्या असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं. शेतकर्‍यांनीही राज ठाकरेंकडून आम्हाला अपेक्षा आहेत अशी भावना व्यक्त केली. याआधी राज यांनी नाशिक मनसे पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. पुढच्या वर्षी होणार्‍या नाशिक मनपा निवडणुकीवरही यात चर्चा झाली. नाशिकमधल्या विकासकामांचाही राज यांनी आढावा घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2015 04:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...