News18 Lokmat

त्र्यंबकेश्वरमध्ये आज अखेरचे शाहीस्नान, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Sep 25, 2015 11:51 AM IST

त्र्यंबकेश्वरमध्ये आज अखेरचे शाहीस्नान, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

DEV Jalarpan

25 सप्टेंबर : राज्यात बारा वर्षातून येणार्‍या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याची शेवटची पर्वणी आज (शुक्रावारी) त्र्यंबकेश्वर मधल्या कुशावर्त तीर्थावर शेवटचं शाही स्नान आज पार पडतंय. विशेष म्हणजे आजच्या पर्वणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: नाशिकमध्ये उपस्थित होते. तिबेटमधल्या मानसरोवरातून आणलेलं पवित्र जल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधिवत जलार्पण करण्यात आलं. महाराष्ट्रातल्या 12 जणांचं शिष्टमंडळ या सद्भावना उपक्रमांतर्गत मानसरोवरात गेलं होतं. गृहराज्यमंत्री राम शिंदे आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं होतं. चीन आणि महाराष्ट्र सरकारनं संयुक्तपणे हा उपक्रम केला असून यावेळी चीनचे वाईस कॉन्सुलेट जनरल चॉन्ग ली आणि कुंभमंत्री गिरीष महाजनही उपस्थित होते. हे उपक्रम भारत आणि चीनमधल्या संस्कृतींचं संगम असून यामुळे चीन आणि भारत या दोन्ही देशांमधली मैत्री अधिक दृढ होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. कैलास तिर्थाचे पाणी कुशावर्तात अर्पण करण्याचा हा अनोखा सोहळा साधू महंतासह भक्तांसाठी एक वेगळी पर्वणी ठरली आहे.

दरम्यान, सिंहस्थ कुभ मेळ्याच्या त्र्यंबकच्या शेवटच्या पर्वणीला माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनीही उपस्थीती लावली. सिंहस्थ कुंभ मेळ्यात सहभागी होता आलं याबाबत पाचपुते यांनी समाधान व्यक्त केलं. आज त्र्यंबकमध्ये सुरू असलेलं हे अखेरचं शाहीस्नान असल्याने मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती पहायला मिळत आहे. तर या शाही पर्वणीसाठी लाखोच्या संख्येने भाविक येण्याचा अंदाज गृहीत धरूनचं प्रशासनही सज्ज आहे. सुरक्षेच्या अनुशंगाने सात हजार पोलीसांचा कडापहारा ठेवण्यात आला असून भाविकांसाठी एसटी प्रशासनातर्फे आठशे बसेस तैनात करण्यात आल्या आहेत.

आज शैवांच्या आखाड्यांचं शाही स्नान पार पडत आहे. पहाटे सर्वप्रथम स्वरुपानंद शकराचार्य यांनी शाही स्नान केल्यानंतर जुना दशनाम आखाडा यांनी कुशावर्तात स्नान केलं. शाही मिरवणूकीला सुरुवात होण्यापूर्वी शाही मार्गावर भाविकांनी रांगोऴ्यांच्या पायघड्यानी साधू-संतांचे स्वागत केलं. सिंहस्थ कुंभ मेळ्यातल्या त्र्यंबकेशरमधील शेवटचे शाही स्नानाचा मान जुना आखाड्याचा दशनाम जुना आखाड्याला मिळाला. त्या आखाड्यातील शाधु महंतांचे शाही स्नान पार पडले. हर हर महादेवच्या गजरात शाही स्नान पार पडले.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2015 07:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...