अंबरनाथ अपघात प्रकरणी प्रीतीला अटक नाही, गुन्हा कधी मागे घेणार ?

Sachin Salve | Updated On: Sep 24, 2015 07:00 PM IST

अंबरनाथ अपघात प्रकरणी प्रीतीला अटक नाही, गुन्हा कधी मागे घेणार ?

ambarnath 43424 सप्टेंबर : अंबरनाथ इथं राहणार्‍या रिटा प्रसाद या महिलेचा दोन महिन्यांपूर्वी रस्त्यावरच्या खड्‌ड्यांमुळे अपघातात मृत्यू झाला होता. पण पोलिसांनी या रिटा प्रसाद यांच्या मुलीवरच या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आयबीएन लोकमतने ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेला जाग आली. रिटा प्रसाद यांच्या मुलगी प्रीतीला आता अटक होणार नाही.

कल्याण-कर्जत महामार्गावर असलेल्या खड्‌ड्यात दुचाकी स्लीप झाल्याने रीटा प्रसाद यांचा मृत्यू झाला होता. या धक्क्यातून सावरत असताना आता याप्रकरणी दुचाकी चालवणारी त्यांची मुलगी प्रीती हिच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. दोन महिन्यांपूर्वी 26 जुलैची ही घटना आहे.  यात रीटा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्या पाच दिवस कोमात होत्या. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.आईच्या मृत्यूने प्रीतीला जबर मानसिक धक्का बसला.

त्यातच शिवाजीनगर पोलिसांनी प्रितीच्याच विरोधात निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केलाय. आयबीएन लोकमतने ही बातमी दाखवल्यानंतर आता प्रशासकीय यंत्रणेला आणि पोलिसांना जाग आलीय. आता प्रीतीला या गुन्ह्यावरून अटक केली जाणार नाहीये. पण तरीसुद्धा प्रीतीवरचा गुन्हा मात्र मागे घेतला जाणार नाहीये. अंबरनाथ सिटीजन फोरमनं पुढाकार घेऊन हा खड्डाही बुजवलाय. याप्रकरणी आता संबंधित अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. रस्त्यांवरत्या खड्‌ड्यांबद्दल जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांची चौकशी करू, असं आता पोलीस म्हणत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 24, 2015 07:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close