समीर निर्दोषच, 'सनातन'ची आदळआपट !

  • Share this:

sanatan4424 सप्टेंबर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी समीर गायकवाडने हत्या केल्याचं तपासातून निष्पन्न झालंय पण तरीही सनातन संस्था समीर गायकवाड निर्दोषच असल्याची आदळआपट करत आहे.

डॉ. पानसरे हत्याप्रकरणी समीर गायकवाड अजूनही दोषी मानालायला तयार नाहीये. आपल्या मैत्रिणीशी बोलताना पानसरेंना आपणच मारल्याचं म्हटलं होतं. पोलीस तपासातही ही बाब समोर आलीय, तरीही सनातनवाले समीरला गायकवाडला खुनी मानायला तयार नाही. आज पुन्हा एकदा सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक आणि संजीव पुन्हाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन समीरची पाठराखण केली.

समीर गायकवाड हा सनातनचा पूर्ण वेळ साधक होता. पोलीस आपलं काम करत आहे. पण आमच्या चौकशीत तो निर्दोष असल्याचाच दावा ऍड. संजिव पुन्हाळकर यांनी केली. तसंच भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांनी सनातनवर बंदीची भाषा करू नये अशी टीकाही पुन्हाळकर यांनी केली.

तर दाभोलकर आणि पानसरे प्रकरणात अनेक आंदोलनं झाली. सेलिब्रिटींनीही आंदोलनात सहभाग घेतला. त्यामुळे तपास यंत्रणेवर दबाव टाकला गेलाय. या दबावाला निष्पाप लोकांचा बळी जातोय त्यापैकी समीर एक आहे असा दावाच अभय वर्तक यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: September 24, 2015, 6:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading