आम्ही फक्त सरकारशी बोलू शकतो आता अधिकार नाही -शरद पवार

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 23, 2015 08:49 PM IST

आम्ही फक्त सरकारशी बोलू शकतो आता अधिकार नाही -शरद पवार

pawar_on_droght23 सप्टेंबर : शेतकर्‍यांची परिस्थिती बिकट आणि भयावह आहे. शेतकर्‍यांसाठी आता आम्ही फक्त सरकारशी बोलू शकतो आता आमच्याकडे तेवढे अधिकारी नाही अशी हतबलता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलून दाखवली. ते यवतमाळमध्ये बोलत होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज (बुधवारी) यवतमाळ जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. त्यांनी आज आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची प्रथमच भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. उस्मानाबाद आणि यवतमाळ जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचं प्रमाण जास्त आहे. इथेच नेमक्या जास्त आत्महत्या का होत आहेत, याचा बारकाईने अभ्यास करायला हवा, असं शरद पवार म्हणाले. मी मोजक्याच ठिकाणी भेटी देऊ शकलो. त्यामुळे सगळ्या राज्याचा निष्कर्ष मी काढू शकत नाही. पण ज्या ठिकाणी पाहणी केली तिथे कर्जबाजारीपणा, नापिक, शेतीमालाला मिळत असलेली अपुरी किंमत यामुळे शेतकरी जीवन यात्रा संपवत आहे. काही ठिकाणी व्यक्तिगत कारणं, कौटुंबिक वाद असू शकता. पण, शेतकर्‍यांनी तीन प्रश्न सरकट मांडले. आता या प्रश्नासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारशी चर्चा करू शकतो. आता आमच्याकडे दुसरे कुठले अधिकार नाही असंही पवार म्हणाले.

दरम्यान, यवतमाळ दौर्‍यात पवारांनी दुपारी पिंपरी बुटी गावाला भेट दिली. तिथल्या आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. विचारपूस केली. इतर ग्रामस्थांशीही त्यांनी संवाद साधला. नापिकी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा, व्यसनाधीनता आणि दारूबंदीची मागणी या सर्व मुद्द्यांवर पवारांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. काही गावकर्‍यांचा संताप अनावर झाला, आणि त्यांनी कडक शब्दांमध्ये आपल्या व्यथा पवारांसमोर मांडल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2015 08:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...