उजनीचं पाणी उसाला नाही, सोलापुरात साखरसम्राट धास्तावले !

उजनीचं पाणी उसाला नाही, सोलापुरात साखरसम्राट धास्तावले !

  • Share this:

ujani dam sol23 सप्टेंबर : उजनीच्या बारमाही आणि आठमाही पाणी वाटपावरुन सोलापूर, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी चांगलेच धास्तावलेत. कारण उजनी धरणातील पाणी हे ऊस शेतीसाठी नसल्याची माहिती सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी दिली आहे. त्यामुळे उजनीतील पाण्यावरून आता चांगलेच रान पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

राज्यातील सर्वात जास्त साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत. त्यामुळे जिल्ह्याच अर्थकारण ऊसशेतीवर अवलंबून आहे. मात्र ,उजनी धरण हे आठमाही धरण असून उजनीच्या मूळ नियोजनामध्ये ऊस पीकांचे कोणतेही नियोजन नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सध्या असलेला ऊस हा पूर्णपणे नियमबाह्य आहे. आत्तापर्यंत उजनीतून शेतकर्‍यांना बारमाही पाणी वाटप केले जायचे. मात्र धरणात अतिरिक्त पाणी साठा असल्यावरच बारमाही पाणी देता येते. अन्यथा आठमाही पाणी वाटपाचीच तरतूद असल्याने अतिरिक्त पाणी देता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलंय. जिल्हाधिकार्‍यांच्या या माहितीमुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडालीय.

दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण विशेषतः सोलापूर जिल्ह्याचे राजकारण हे साखर उद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे त्या भागातील राजकीय नेते हे उजनीतून इतर पिकांच्या नावाखाली का होईना पाणी मिळवण्यासाठी खटाटोप करताना दिसतायत. मात्र जलसिंचन विभागाने हे पाणी उसासाठी नसल्याचे ठणकावून सांगितल्याने साखर सम्राटांची चांगलीच गोची झालीय.

ऐन पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवली. उजनी धरनातील पाणी साठा अद्याप ही पाच टक्क्याच्या वर ही गेला नाही त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखानदार आमदारांची चलबिचल सुरू झालीय.

आघाडी सरकारच्या काळात उजनीच पाणी कोणाला आणि किती प्रमाणात द्यायच हा वाद पहायला मिळायचा. मात्र, युती सरकारच्या काळात हे पाणी नेमक कोणत्या पिकासाठी द्यायच हा वाद पाहायला मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: September 23, 2015, 7:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading