23 सप्टेंबर : राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सुवर्णकमळ मिळालेल्या 'कोर्ट' सिनेमाला भारताकडून ऑस्कर पुरस्कारासाठी अधिकृत एंट्री मिळालीय. 88व्या ऑस्कर पुरस्कारासाठी 'फॉरिन लँग्वेज'मध्ये मराठी सिनेमा 'कोर्ट' भारताकडून ऑस्करच्या स्पर्धेत पाठवला गेलाय.
राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सुवर्णकमळ मिळालेला 'कोर्ट' हा सिनेमाला भारताकडून ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवला जाणार आहे. ऑस्कर पुरस्कारासाठी यापूर्वी 'श्वास' आणि 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या मराठी सिनेमांची ऑस्करवारीसाठी भारताकडून निवड झाली होती.
यावेळी ऑस्कर कमिटीचं अध्यक्षपद अमोल पालेकर यांच्याकडे होतं, तर रवी जाधवसुद्धा या समितीमध्ये होते. कोर्ट या सिनेमाने भारतात रिलीज होण्यापूर्वीच परदेशातील अनेक मानाच्या फिल्म फेस्टीव्हलमध्ये पुरस्कार मिळवले होते. आता ऑस्कर जिंकण्यासाठी 'कोर्ट' सज्ज झालेला आहे.
चैतन्य ताम्हाणेचं पहिलंच दिग्दर्शन, गीतांजली कुलकर्णीने साकारलेली महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आणि संभाजी भगत यांच्या दमदार आवाजाततली गाणी ही कोर्टची वेशिष्ट्यं सांगता येतील. भारतातील न्यायव्यवस्थेवर सिनेमात अतिशय परिणामकारक भाष्य करण्यात आलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |