औरंगाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या 3 जणांना अटक

औरंगाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या 3 जणांना अटक

  • Share this:

Aurangabad Rape

23 सप्टेंबर :  औरंगाबादमध्ये काल (मंगळवारी) 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या चार नराधमांपैकी तिघांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी औरंगाबादच्या छावणी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. मच्छिंद्र गायकवाड, शेख सत्तार, रुपचंद तिरके अशी या आरोपींची नावं आहेत. तर एकाचा शोध घेणं अजूनही सुरू आहे.

साजापूर इथे राहणारी 17 वर्षांच्या तरूणी सोमवारी संध्याकाळी बजाजनगरातील आपल्या 25 वर्षांच्या तरुण तिसगाव शिवारातील रस्त्यावर गप्पा मारत बसले होते. दोघेही एकांतात गप्पा मारत असताना पाळत ठेवून असलेल्या चौघा नराधमांनी त्यांना गाठून तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर तरुणीला उचलून जवळच्याच एका तळ्याजवळ आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केले. जखमी अवस्थेत तरुणाने मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर हे चौघे नराधम घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी औरंगाबादच्या छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2015 10:04 AM IST

ताज्या बातम्या