News18 Lokmat

सामूहिक बलात्काराच्या दोन घटनांनी औरंगाबाद हादरलं

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Sep 22, 2015 12:20 PM IST

rape_634565

22 सप्टेंबर : 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसह एका 30 वर्षीय विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना तिसगाव शिवार आणि रांजणगावमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण औरंगाबाद जिल्हा हादरून गेला आहे.

औरंगाबादजवळच्या साजापूर गावातल्या तिसगाव शिवारात संध्याकाळी एक तरुणी आणि बजाजनगरातील 25 वर्षांचा तरुणासह फिरायला गेली होती. त्यावेळी चार नराधमांनी त्यांचा पाठलाग केला. निर्सजनस्थळी त्यांना गाठून तरूणाला मारहाण करत या नराधमांनी अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर चौघेही नराधम पसार झाले. दरम्यान, याप्रकरणी औरंगाबादच्या छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीवर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून बलात्कार करणार्‍या दोन संशियितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

तर दुसरी घटना रांजणगाव इथल्या सद्गुरूनगरमध्ये राहणार्‍या एका 30 वर्षीय महिलेवर सोमवारी पहाटेच्या सुमारास 7 जणांनी घरात घुसून आळीपाळीने बलात्कार केला. या वेळी महिलेला सिगारेटचे चटकेही देण्यात आले. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनांमुळे औरंगाबादमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 22, 2015 11:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...