दारू पिऊन महिलेचा पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा

दारू पिऊन महिलेचा पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा

  • Share this:

woman_drunk43421 सप्टेंबर : मुंबईत महिलेनं दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा प्रकार पुन्हा एकदा पुढे आलाय. यावेळी हा सर्व प्रकार रस्त्यावर नाही तर चक्क पोलीस ठाण्यात घडलाय. या सर्व प्रकारनं पोलीसही गांगरुन गेले होते.

घडलेली हकीकत अशी की, अंधेरीतल्या एमआयडीसी पोलिसांना फोन आला होता. "एक महिला एक मोठ्या हॉटेलसमोर गोंधळ घालतेय." त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी पोहचून त्या महिलेला ताब्यात घेतलं. ही महिला खुप दारू प्यायली होती म्हणून हॉटेलनं या महिलेला प्रवेश नाकारला. त्यावर चिडून या महिनेनं हॉटेलसमोरचं गोंधळ घालायला सुरुवात केली, दारू पिऊन झाल्यावर या महिलेनं बाटली फोडली. हा सर्व प्रकार पाहिल्यावर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं. पण हा सगळा प्रकार इथपर्यंतच थांबला नाहीतर ही महिला पोलीस ठाण्यात गेल्यावरही गोंधळ घालत होती. पोलिसांना धमकावत राहिली. कधी आपण अनाथ असल्याचं तर कधी मॉडेल तर कधी पत्रकार असल्याचं पोलिसांना सांगत राहिली. सकाळी दारू उतरल्यावरच या महिलेनं स्वत: विषयी खरी माहिती द्यायला सुरुवात केली. तिनं पोलिसांची माफी मागितली. मग पोलिसानी या महिलेनं माफी मागितल्यावर तीला समज देऊन सोडून दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: September 21, 2015, 4:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading