नागपूर 'फोकस'मध्ये! बांगलादेशला मोठा झटका, टीम इंडियाकडे टी-20ची सत्ता?

नागपूर 'फोकस'मध्ये! बांगलादेशला मोठा झटका, टीम इंडियाकडे टी-20ची सत्ता?

भारत-बांगलादेश यांनी तीन सामन्यांच्या मालिकेतील 1-1 अशी बरोबरी केली आहे.

  • Share this:

नागपूर, 10 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांनी तीन सामन्यांच्या मालिकेतील 1-1 अशी बरोबरी केली आहे. या दोन्ही संघांमध्ये आज नागपूरात अखेरचा टी-20 सामना होणार आहे. बांगलादेशनं पहिला सामना जिंकत विजयी आघाडी मिळवली होती, त्यानंतर राजकोटमध्ये भारतानं मालिकेत बरोबरी केली. मात्र तिसऱ्या टी-20 सामन्यात बांगलादेशला मोठा झटका बसला आहे, त्यामुळं टीम इंडियाचा विजय जवळ जवळ निश्चित झाला आहे.

एकीकडे बांगलादेशचा संघ पहिल्यांदाच भारताला नमवत मालिका जिंकण्याचे स्वप्न पाहत आहे तर दुसरीकेड त्यांचे खेळाडू जखमी होत आहेत. त्यामुळं बांगलादेशसमोर सध्या जखमी खेळाडूंची समस्या आहे. बांगलादेशचे दोन स्टार खेळाडू सध्या दुखापतींमुळे त्रस्त आहेत. त्यामुळं भारताचा विजय जवळजवळ निश्चित झाला आहे.

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू मोसाद्देक हुसैन (Mosaddek Hossain) आणि जलद गोलंदाज मुस्ताफिजुर रहमान (Mustafizur Rahman) जखमी असल्यामुळं तिसऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. दोन्ही खेळाडूंनी शनिवारी झालेल्या सराव वर्गात सहभाग नोंदवला नव्हता. त्यामुळं या दोन खेळाडूंशिवाय मैदानात उतरणे बांगलादेशसाठी सोपे नसणार आहे.

वाचा-मॅच फिक्सिंग प्रकरणात मोठी कारवाई, आंतरराष्ट्रीय बुकीला अटक

दुसरीकडे दुसऱ्या टी-20 सामन्यात कमबॅक केल्यानंतर तिसऱ्या सामन्यात खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला असावा. मात्र भारताला गोलंदाजीमध्ये सुधार करण्याची गरज आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं सुमार गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केले. त्यामुळं खलील अहमदला डच्चू देत शार्दूल ठाकूरला संघात स्थान मिळू शकते.

वाचा-'फक्त भारतातच असं होऊ शकतं', अयोध्या निकालावर भारतीय क्रिकेटपटूचं ट्विट

करो या मरोच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात बांगलादेश संघातील खेळाडू जखमी झाल्यामुळं युवा खेळाडूंना संधी मिळू शकते. बांगलादेशला मालिका विजयासाठी आपली सर्वोश्रेष्ठ खेळी करावी लागणार आहे. आज दुपारी नागपूरच्या पीचचा अभ्यास केल्यानंतर बांगलादेशचा कोचनं प्लेयिंग इलेव्हनमध्ये बदल होतील असे सांगितले होते.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, मनीष पांडे, कृणाल पंडय़ा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, राहुल चहर, यजुर्वेद्र चहल, संजू सॅमसन, खलिल अहमद.

बांगलादेश : मदमुदुल्ला रियाद (कर्णधार), तैजूल इस्लाम, मोहम्मद मिथुन, लिटन दास, सौम्य सरकार, नैम शेख, मुशफिकर रहिम, अफिफ हुसैन, मोसादीक हुसेन सैकत, अमिनूल इस्लाम, अराफत सन्नी, अबू हैदर, अल-अमिन हुसैन, मुस्तफिझूर रेहमान, शफिऊल इस्लाम.

Published by: Priyanka Gawde
First published: November 10, 2019, 3:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading