दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी टीम इंडियाची निवड

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी टीम इंडियाची निवड

  • Share this:

asraerary

20 सप्टेंबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 ऑक्टोबरपासून सुरु होणार्‍या वन डे आणि टी-20 मॅचसाठी आज भारतीय टीमची घोषणा करण्यात आली असून या दोन्ही मालिकांमध्ये महेंद्र सिंग धोनी टीम इंडियाचं नेतृत्त्व करणार आहे.

आज बेंगळूरमध्ये बीसीसीआयच्या निवड समितीची बैठक झाली.या बैठकीत टी-20 साठीचा संघ निवडण्यात आला. त्यामध्ये शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, महेंद्र सिंग धोनी (कर्णधार), अंबाती रायडू, अजिंक्य रहाणे, स्टुअर्ट बिन्नी, आर अश्विन, अक्षर पटेल, हरभजन सिंह, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, अमित मिश्रा, एस अरविंद आदींचा समावेश आहे. या टी-20 मध्ये एस अरविंद या नवीन चेहर्‍याला संधी देण्यात आली आहे. तर हरभजनसिंग याची टी-20 साठी निवड करण्यात आली आहे.

याशिवाय वन डे मॅचसाठीच्या टीमचीही आज निवड करण्यात आली. यामध्ये शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, महेंद्र सिंग धोनी (कर्णधार), अंबाती रायडू, अजिंक्य रहाणे, स्टुअर्ट बिन्नी, आर अश्विन, अक्षर पटेल, गुरकीत, अमित मिश्रा, मोहित शर्मा, उमेश यादव, भुवनेश्वर आदींचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2015 02:22 PM IST

ताज्या बातम्या