देव तारी..,दिडशे फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुरडीची सुखरूप सुटका

देव तारी..,दिडशे फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुरडीची सुखरूप सुटका

  • Share this:

shridi girl319 सप्टेंबर : शिर्डीत आज सकाळी दिडशे फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या एका 3 वर्षांच्या मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात गावकर्‍यांना यश आलंय. शिर्डीतल्या नेवासा तालुक्यातल्या चांदा गावातली ही घटना घडली.

घडलेली हकीकत अशी की, आज (शनिवारी) सकाळी 8 वाजता मनीषा गायकवाड ही मुलगी दिडशे फूट खोल असलेल्या बोअरवेल मध्ये पडली होती.तीचे नशीब बलवंत्तर होते कारण फक्त 14 फुटावर दगड असल्याने तिथपर्यंतच बोअरवेलचा खड्डा मोठा होता. आणि ही मुलगी त्या दिडशे फूट खोल असलेल्या बोअरवेलमध्ये 14 फुटावर अडकली होती. गावकर्‍यांनी धावाधाव केली आपल्याकडील साधने आणली, तसंच जेसीबी मशीनही बोलवण्यात आली.

बोअरवेलच्या खड्याशेजारी जेसीबीच्या सहाय्याने समांतर दुसरा मोठा खड्डा करून मुलीला तासाभरात सुखरूप बाहेर काढले. अनेकजन शेतात घेतलेल्या बोअरवेलला पाणी लागले नाही तर हा बोअरचा खड्डा तसाच उघडा ठेवतात. आणि अशा प्रकारे लहान मुलांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो.

बोअरवेलच्या खड्यात पडून आजपर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना होवू नये यासाठी ज्यांनी बोअरवेलचे खड्डे उघडे ठेवले असतील त्यांनी ते खरंतर बुजवून टाकायला हवेत.प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असे नाही आजच्या घटनेत प्रशासन आणि गावकर्‍यांनी केलेली मोलाची मदत मनिषाला नवीन आयुष्य देवून गेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: September 19, 2015, 4:29 PM IST

ताज्या बातम्या