S M L

सनातनला क्लीन चिट देणार्‍या चंद्रकांत पाटलांनी माफी मागावी -विखे पाटील

Sachin Salve | Updated On: Sep 19, 2015 02:06 PM IST

सनातनला क्लीन चिट देणार्‍या चंद्रकांत पाटलांनी माफी मागावी -विखे पाटील

19 सप्टेंबर : गोविंद पानसरे हत्येप्रकरणी सनातनच्या साधकाला अटक झाल्यानंतर सरकारने आता तरी सनातनवर तात्काळ बंदी आणावी आणि सनातनला क्लीन चीट देणारे कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विखे पाटील यांनी केली. तसंच डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि कर्नाटकातले डॉ.कलबुर्गी यांच्या हत्येमागे सनातनचाच हात असल्याचा आरोपही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज कॉ.गोविंद पानसरे कुटुंबियांची भेट घेतली. कॉ. उमा पानसरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांनी पानसरे कुटुंबियांशी चर्चा केली. त्यानंतर मीडियाशी बोलतांना सनातनवर ताबडतोब बंदी घालावी, पानसरे हत्या प्रकरणात सनातन्यांचा सहभाग असल्याचा तपास यंत्रणांना अगोदर पासूनच माहीत होतं. मात्र, तपास यंत्रणांवर दबाव होता. डॉ.दाभोलकर , कॉम्रेड पानसरे आणि कलबुर्गी या तीनही हत्यामागे सनातनवादी असल्याचा संशय तपास होता असा आरोप विखे पाटील यांनी केला. तसंच यंत्रणांमध्ये राजकीय हस्तक्षेप नसावा. कोणत्याही तपास अधिकार्‍याची बदली होऊ नये अशी मागणही पाटील यांनी केली. यावेळी विखे पाटील यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर निशाणा साधला. सनातनला क्लीन चीट दिल्याप्रकरणी चंद्रकांत पाटलांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली.

दरम्यान, मी सनातनला कधीही क्लीन चिट दिली नाही. तपासात ज्या गोष्टी समोर येतील, त्यावरून सनातनवर बंदी आणायची की नाही ते ठरवलं जाईल, असं कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 19, 2015 02:06 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close