बाप्पा पावला...! मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात पावसाची जोरदार हजेरी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2015 03:47 PM IST

बाप्पा पावला...! मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात पावसाची जोरदार हजेरी

rain in vardha34

18 सप्टेंबर : तीव्र दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या महाराष्ट्राला आज (शुक्रवारी) मुसळधार पावसाने मोठा दिलासा दिला. विघ्नहर्त्या गणरायाचे आगमनानंतर काही तासातच राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस पडत असून त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यातल्या धोरखेडा गावात चक्रीवादळाने थैमान घातलं. अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे धोरखेडा गावात अनेक ठिकाणी पडझड झाली असून यात 5 जण जखमी झालेत तर अनेकांचे संसार उघड्यावर आलं आहेत.

पुणे, औरंगाबाद, नाशिक, परभणी, बीड, जळगाव, अकोला, अमरावती, वर्धासह इतरही ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. मराठवाड्यात गुरुवारी रात्रीपासून पाऊस पडतो आहे. या पावसामुळे दुष्काळग्रस्त भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. शेततळ्यांमध्ये आणि कालव्यांमध्ये पाणी वाहू लागले आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी धबधबेही जिवंत झाले आहेत. वेरूळ लेण्याजवळील धबधबेही वाहू लागले आहेत. त्यामुळे अनेक पर्यटकांनी तिकडे गर्दी केली आहे.

पुण्यातही आज सकाळपासून पावसाचा सरी कोसळत आहेत. पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्येही पावसाला सुरूवात झाली आहे. संततधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. पुण्याचही पावसाचा जोर आहे. अनेक रस्त्यावर पाणी साठलं असून, त्यातूनच वाहनचालकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना मार्ग काढत पुढे जावं लागतं आहे.

विदर्भातही पावसाचा जोर कायम आहे. चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार पडते आहे. चंद्रपूरमधील महत्त्वाचे इराई धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे या धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. अन्य ठिकाणीही नद्या, नाले दुथडी भरून वाहताहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वाचे असणारे येळगाव धरण भरलं आहे.

Loading...

उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबारमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे कुंभमेळ्यातील तिसर्‍या शाहीस्नानाला उशीरा सुरुवात झाली. सिन्नर इथे 88 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दुष्काळग्रस्त सोलापूरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे बळीराजा आनंदित झाला असून, नागरिकही सुखावले आहेत. पुणे ते सोलापूर दरम्यानच्या पालखी मार्गावरील गावांमध्येही पाऊस पडतो आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2015 03:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...