पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानतळावर हल्ला; 6 दहशतवादी ठार

पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानतळावर हल्ला; 6 दहशतवादी ठार

  • Share this:

fdwerawpy

18 सप्टेंबर : पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी आज मोठा हल्ला केला. पेशावरजवळ असलेल्या हवाई दलाच्या विमानतळावर आज सकाळी आठ ते दहा सशस्त्र दहशतवाद्यांनी जोरदार हल्ला चढवला. यानंतर उडालेल्या चकमकीत 6 दहशतवादी ठार झाले, , दोन सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 25 नागरिकांसह एक मेजर आणि तीन जवान जखमी झाले आहे.

दहशतवाद्यांनी पेशावरमधल्या पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर सशस्त्र हल्ला चढवला. अद्याप लष्कर आणि दहशतवादी यांच्यात धुमश्चक्री सुरू आहे. आत्तापर्यंत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे पाकिस्तानी लष्करी अधिकार्‍यांनी सांगितलं.

शीघ्र कृतीदल घटनास्थळी तैनात झाले असून त्यांनी दहशतवाद्यांना वेढा घातला आहे. पुढील परिस्थितीवर पाक लष्कर लक्ष ठेवून आहे. दरम्यान तहरिक-ए-तालिबान-पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First Published: Sep 18, 2015 10:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading