कुंभनगरीत तिसर्‍या शाही पर्वास सुरुवात

  • Share this:

Kumbh-mela-shahi

18 सप्टेंबर : नाशिकमध्ये कुंभपर्वाची तिसरी आणि शेवटची पर्वणी संपन्न होतं असून, तिसर्‍या आणि अखेरच्या शाहीपर्वणीपूर्वीचं वरुणराजानेही जोरदार हजेरी लावली आहे. ऋषीपंचमी असल्यानं या पर्वणीला महीलांच्या दृष्टीनं वेगळं महत्व आहे. त्यामुळं आज महिलांची संख्या जास्त असण्याची शक्यता वर्तवली जातेय. तर दुसरीकडे, नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास शाही मिरवणूक उशिरा निघण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यामुळे सतत पडणार्‍या पावसाचा भाविकांच्या उत्साहावर परिणाम झाला असला, तरीही साधूंच्या उत्साहात मात्र तसूभरही फरक पडला नाही.

दरम्यान, यंदाही प्रशासनाची तयारी गेल्या पर्वणीसारखीच असल्यानं भाविकांना या वेळीही सहज सुलभ शाही स्नानाचा लाभ घेता येणार आहे. गेल्या पर्वणीत 50 लाख भाविकांनी स्नानाचा लाभ घेतला होता. पण या पर्वणीला गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानं आज भाविकांची संख्या कमी होण्याची शक्याता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2015 07:37 AM IST

ताज्या बातम्या