ठोस पुराव हाती लागलाय, आता सनातनवर बंदी घाला -चव्हाण

  • Share this:

cm prithviraj chavan resign17 सप्टेंबर : आता ठोस पुरावा हाती लागलाय. त्यामुळे सनातन सारख्या संस्थेवर बंदी घालावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीये.

कॉंम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा कार्यकर्ता समीर गायकवाड याला पोलिसांनी अटक केलीये. या आरोपीच्या

अटकेमुळे पुन्हा एकदा सनातनवर संशय आता गडद झालाय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण मुख्यमंत्री असतांना सनातनसारख्या अतिरेकी, जातीयवादी संघ जातियवादी संघटनांवर बंदी घालावी असा प्रस्ताव मी केंद्राकडे पाठवला होता असा खुलासा केलाय.

पण आता सनातन विरोधात ठोस पुरावा हाती लागलाय. त्यामुळे राज्य सरकारने अधिक पाठपुरावा करून केंद्राकडे नव्याने प्रस्ताव पाठवला पाहिजे. मोदी सरकारने अशा संघटनेवर बंदी घालावी अशी मागणीही चव्हाण यांनी केली. तसंच नरेंद्र दाभोलकर आणि कर्नाटकमधील कलबुर्गी यांची हत्या प्रकरण असो या हत्येमागे एकच विचारधारा असावी असा संशयही त्यांनी व्यक्त केला. या विचारधारेमागे असणार्‍या सूत्रधारांना वेळीस जेरबंद केलं पाहिजे असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2015 10:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading