सनातनवर बंदीचा प्रस्ताव आलाच नव्हता, शिंदेंचा खुलासा

  • Share this:

5shinde17 सप्टेंबर : सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवला होता.पण तो प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला होता तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तो प्रस्ताव फेटाळला होता. मात्र, आपल्याकडे असा प्रस्ताव आलाच नव्हता, असं सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलं.

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर हिंदुत्ववादी सनातन संस्थेवर संशय व्यक्त केला गेला होता. यावर बराच वादही झाला होता. त्यानंतर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आता सनातनचा कार्यकर्ता समीर गायकवाडला या प्रकरणी अटक करण्यात आलीये.समीर गायकवाड सनातन संस्थेशी संबंधित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सनातन संस्थेबद्दल चर्चा सुरू झालीय. मुख्यमंत्री असतांना सनातनसारख्या अतिरेकी, जातीयवादी संघ, जातीयवादी संघटनांवर बंदी घालावी असा प्रस्ताव मी केंद्राकडे पाठवला होता असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं. केंद्राने तो प्रस्ताव फेटाळला होता, हा प्रस्ताव आता युती सरकारनं परत केंद्राकडे पाठवावा असंही ते म्हणाले. पण दुसरीकडे तत्कालीन सुशीलकुमार शिंदे यांनी असा कोणताही प्रस्ताव आलाच नव्हता असा खुलासा केल्यामुळे यूपीए सरकारलमधला घोळ यामुळे समोर आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: September 17, 2015, 6:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading