16 सप्टेंबर : रिक्षाचालकांना मराठीच्या सक्तीचा राज्य सरकारचा निर्णय वादात अडकलाय. रिक्षाचालकांना मराठी सक्तीचं करणं यावर विरोधकांनी आक्षेप घेतलाय. अशी सक्ती करण्याची आवश्यकताच काय असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. तसंच काही रिक्षाचालकांनीही यावर नाराजी व्यक्त केलीये.
मराठी बोलणार्यांच यापुढे ऑटोचे परवाने मिळणार आहेत. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही घोषणा केलीय. रिक्षाचे परवाने मिळण्यासाठी यापुढे मराठी बोलता आणि लिहिता येणं बंधनकारक असेल, असंही रावते यांनी म्हटलंय. मुंबई क्षेत्रात 1 लाख नवे परवाने देण्यात येणार आहेत. पण नवीन परवान्यासाठी मराठी भाषा यायला हवी, ही अट आहे. दरम्यान, ज्या राज्यात तुम्ही राहता, ती भाषा बोलता येणं सक्तीचं आहे असं कायद्यातच लिहिलेलं आहे असं स्पष्टीकरण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |