News18 Lokmat

तब्बल 23 तासानंतर अखेर पश्चिम रेल्वेची वाहतूक रुळावर

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Sep 16, 2015 01:57 PM IST

तब्बल 23 तासानंतर अखेर पश्चिम रेल्वेची वाहतूक रुळावर

WESTERN DERAILED

15 सप्टेंबर : अंधेरीजवळ लोकलचे 7 डबे घसरल्यानं तब्बल 22 तास विस्कळीत झालेली पश्चिम रेल्वेची वाहतूक पुढच्या काही तासात पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. रुळावरून घसरलेले सर्व डबे हटवण्यात रेल्व प्रशासनाला यश आल्यानं आता जलद मार्गही काही वेळापूर्वी खुला करण्यात आला आहे, मात्र वाहतूक अतिशय धीम्या गतीनंच सुरू आहे. त्यामुळे कालप्रमाणेच आजही मुंबईकरांना प्रचंड त्रासाला सामोरं जाव लागतय.

पश्चिम रेल्वेवर काल (मंगळवारी) सकाळी 11च्या अंधेरी- विलेपार्ले स्टेशनांदरम्यान चर्चगेटकडे येणार्‍या फास्ट लोकलचे 7 डबे रुळावरुन घसरले. त्यामुळे दिवसभर केवळ धीम्या मार्गावरून वाहतूक सुरू होती. लाइफलाईनच कोलमडल्यानं प्रवाशांचे चांगलेच हाल झाले होते. जवळपास 22-23 तासानंतर पश्चिम रेल्वेच्या कर्मचार्‍यांना अखेर सकाळी 9.30च्या सुमारास कर्मचार्‍यांनी शेवटचा डबा हटवला. आता चारही मार्गावरून पश्चिम रेल्वे धावू लागली आहे. मात्र ऐन गर्दीच्या वेळीही वेळापत्रक कोलमडलेलंच असल्याने प्रवाशांना सलग दुसर्‍या दिवशी मनस्ताप सहन करावा लागतोय.

दरम्यान, पश्चिम रेल्वेवरील खेळखोळंबा बघून अनेक प्रवाशांनी गाड्यांनी प्रवास करण्यास प्राधान्य दिलं. मात्र त्यामुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरही भीषण वाहतूक कोंडी झाली होती.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 16, 2015 11:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...