गणेश मंडळ पाहणी पथक आहे की नाही? -कोर्टाकडून सरकारला विचारणा

  • Share this:

mumbai high court43415 सप्टेंबर : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडप पाहणी करता पाहणी पथकं अस्तित्वात आहेत का अशी विचारणा उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केलीये. मंडपांच्या पाहणीसाठी नेमलेली पथकं प्रत्यक्ष कार्यरत आहेत की केवळ कागदेपत्रीच आहेत याचा खुलासा करावा, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहे. नवी मुंबईतील गणेश मंडळाविरोधात एका याचिकेवर न्यायालयाचे राज्य सरकारला खुलासा देण्याचे आदेश आहेत.

सर्व गणेश मंडळांसाठी IBN लोकमतचे सवाल

- पोलीस आणि कोर्टाने घालून दिलेले सर्व नियम पाळण्यात येतायत का?

- ज्या मंडळांनी कोर्टाचे आदेश झुगारून मंडप रस्त्यावर उभारलेत, त्यांना कोर्टाचा आदेश मान्य नाही का?

- गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी योजना तयार केल्या आहेत का?

- रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांना जाण्यासाठी रस्त्यावर पुरेशी जागा ठेवलीय का?

- सुरक्षेच्या उपाययोजनांचं प्रशिक्षण कार्यकर्त्यांना दिलंय का?

- स्थानिकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेतलीय का?

- महिलांची छेड काढणे, शेरे मारणे असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी मंडळांनी घेतलीय का?

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First Published: Sep 15, 2015 09:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading