'परे'ची वाहतूक उद्या पहाटेपर्यंत ट्रॅकवर ?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 15, 2015 10:55 PM IST

'परे'ची वाहतूक उद्या पहाटेपर्यंत ट्रॅकवर ?

western train3415 सप्टेंबर : अंधेरी आणि विलेपार्ले स्टेशनच्या दरम्यान लोकलचे सात डबे घसरल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीये. युद्धपातळीवर डबे रुळावर आणण्याचा काम सुरू आहे. पण, हे काम मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार असून पश्चिम रेल्वे ट्रॅकवर येण्यासाठी उद्याची पहाट उजाडण्याची शक्यता आहे.

नेहमी मध्य रेल्वेवर काही ना काही कारणामुळे रेल्वे विस्कळीत होत असते. पण आज कधी नव्हे ते पश्चिम रेल्वे विस्कळीत झालीये. अंधेरी ते विलेपार्ले स्टेशनच्या दरम्यान, विरारहुन चर्चगेटकडे जाणारी 10.53 ची लोकल घसरली. या लोकलचे सात डबे क्रासिंगच्या वेळी रुळावरून घसरले. सुदैवाने मोटरमॅनने प्रसंगावधान राखत जोरदार ब्रेक मारला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पश्चिम रेल्वेच्या 5 व्या आणि 6 व्या मार्गावर हा अपघात झाला. या दोन्ही ट्रॅकवर अप आणि डाऊन मार्गावर जलद गाड्या धावत असता. पाचव्या मार्गावर लोकल घसरल्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील फास्ट लोकल पूर्णपणे ठप्प झाल्या आहे.

परे स्लो ट्रॅकवर

विरार ते चर्चगेट मार्गावरील सर्व लोकल स्लो ट्रॅकवर वळवण्यात आल्या आहे. त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून सर्व गाड्या धीम्या गतीने सुरू आहे. वेळापत्रक पूर्ण पणे कोलमडलंय. दुपारपर्यंत विरार ते अंधेरीपर्यंत लोकल सुरू होत्या. दुपारनंतर विरार ते चर्चगेट आणि चर्चगेट लोकल सुरू झाल्या. स्लो ट्रॅकवर ताण पडल्यामुळे सर्व गाड्या धीम्या गतीने सुरू आहे. तासंतास ताटकळत चाकरमान्यांना घरं गाठावं लागत आहे. फक्त मीरा रोड ते अंधेरीपर्यंतचा प्रवास गाठण्यासाठी दोन ते तीन तास लागत आहे. विशेष म्हणजे ऐन संध्याकाळी चाकरमान्यांची विरारच्या दिशेनं जाण्यासाठी तोबा गर्दी असते त्यातच लोकल अपघातामुळे आता स्टेशनवर ऐन संध्याकाळी प्रवाशांची गर्दी उसळलीये. धीम्या गाड्या गर्दीने खचाखच भरून गेल्या आहे. प्रचंड लोकलगर्दी प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. त्यातच होत असलेल्या विलंबामुळे प्रवाशी मेटाकुटीला आले आहे.

पहाट उजाडणार

Loading...

घटनास्थळी पश्चिम रेल्वेच्या क्रेन्स दाखल झाल्या आहेत. घसरलेले डबे हटवण्याचं काम वेगात सुरू आहेत. हे डबे रुळावरून हटवेपर्यंत साधारणतः 30 ते 40 टक्के ट्रेन्स या रद्द करण्यात येतील अशी माहिती रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिलीय. संध्याकाळपर्यंत 5 वा ट्रॅक पूर्ववत होण्याची शक्यता आहे. पण, हे काम मध्यरात्रीपर्यंत पूर्ण होईल की नाही याचीही शाश्वती नाही. त्यामुळे उद्यापर्यंत हे काम सुरूच राहणार आहे.

हायवेवर ट्रॅफिक जाम

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांनी बेस्ट, रिक्षा आणि टॅक्सीकडे वळवलाय. पण इथंही अतिरिक्त ताण पडल्यामुळे वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी झालीये. हायवेवर लांबच्या लांब रांगा लागल्या आहे. तासंतास वाहतूक कोंडीत अडकून चाकरमान्यांना आज घर गाठवं लागत आहे. बेस्टकडून जादा गाड्या सोडण्यात आल्या आहे. खचाखच प्रवाशांच्या गर्दीने बेस्टच्या बसेस धावत आहे. रिक्षा आणि टॅक्सीचालक प्रवाशांना वेठीस धरून अवाच्या सव्वा भाडे आकारत असल्याचे प्रकार घडत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2015 06:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...