News18 Lokmat

इंदिरा आणि राजीव गांधींची टपाल तिकिटं हद्दपार !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 15, 2015 05:23 PM IST

इंदिरा आणि राजीव गांधींची टपाल तिकिटं हद्दपार !

15 सप्टेंबर : भारतीय टपाल विभागानं काढलेली इंदिरा आणि राजीव गांधीची टपाल तिकिटं आता वापरण्यात येणार नाहीत. कारण इंदिरा आणि राजीव गांधी यांची टपाल तिकिटे आता हद्दपार होऊन दीनदयाळ उपाध्याय, जयप्रकाश नारायण, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि राममनोहर लोहिया यांची टपाल तिकिटं आणली जाणार आहेत. केंद्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय'च्या आदेशावरूनच हा निर्णय घेण्यात आलाय. अशी माहिती 'इंडियन एक्स्प्रेस' वृत्तपत्राला माहिती अधिकारातून मिळालीये.

टपाल विभागाने आघाडी सरकारच्या कार्यकाळात 2008 मध्ये नऊ महत्त्वाच्या व्यक्तींची छायाचित्रे असलेल्या टपाल तिकिटांची मालिका सुरू केली होती. त्यात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यासह महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर, होमी भाभा, जेआरडी टाटा व मदर तेरेसा यांचा समावेश होता. नव्या मालिकेत आता उपाध्याय, नारायण, मुखर्जी, लोहिया यांच्याव्यतिरिक्त लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराज, भीमसेन जोशी, विवेकानंद, भगतसिंग, पं. रविशंकर आदींची छायाचित्रे असलेल्या टपाल तिकिटांचा समावेश असेल. गेल्या वर्षी केंद्र सरकारने इंदिरा गांधी राजभाषा पुरस्कार आणि राजीव गांधी राष्ट्रीय ज्ञान-विज्ञान

मौलिक पुस्तक लेखन पुरस्कार या पुरस्कारांचे नामांतर अनुक्रमे राजभाषा कीर्ती पुरस्कार आणि राजभाषा गौरव पुरस्कार असे केले होते.

आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून सर्वांना गौरवण्यात आले होते. मात्र, त्यापैकी इंदिरा आणि राजीव यांच्या तिकिटांची छपाई बंद करण्याचे आदेश टपाल विभागाला देण्यात आल्याचे 'द इंडियन एक्स्प्रेसस'ने दाखल केलेल्या माहिती अधिकाराच्या अर्जातून स्पष्ट झाले आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 15, 2015 05:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...