Elec-widget

कोट्यवधीचे घोटाळे करून हे कसलं जेलभरो ? - राज ठाकरे

  • Share this:

raj thackaey pc14 सप्टेंबर : हजारो कोटींचा भ्रष्टाचार करून राष्ट्रवादी कसलं आंदोलन करतेय असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय. तसंच भाजप आणि राष्ट्रवादीत काहीही फरक नाही, परिस्थिती अशीच राहिली तर मराठवाड्याचं वाळवंट होईल असंही राज म्हणाले.

राज ठाकरे आज (सोमवारी) नाशिकच्या दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांच्या भेटी घेऊन व्यथा जाणून घेतल्या. मनसेतर्फे शेतकर्‍यांना मदतनिधी उभारला जाणार आहे. यासाठी राज ठाकरे नाशिकमध्ये शेतकर्‍यांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी त्यांना शेतकर्‍यांनी आसूड भेट दिला. दुष्काळाच्या प्रश्नावर मनसेनं सरकारवर आसूड ओढला असं यावेळी राज म्हणो. तसंच हजारो कोटींचे घोटाळे करून राष्ट्रवादी कसलं जेलभरो आंदोलन करत आहे अशी टीकाही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2015 08:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...