सीएसटी स्टेशनवर लोकल घसरली, हार्बर लाईन ठप्प

सीएसटी स्टेशनवर लोकल घसरली, हार्बर लाईन ठप्प

  • Share this:

cst harbar line14 सप्टेंबर :  : ऐन गर्दीच्या वेळी सीएसटी स्टेशनवर लोकलचा डबा घसरलाय. त्यामुळे सीएसटी ते वडाळ्यापर्यंतची वाहतूक ठप्प झालीये. सीएसटी स्टेशनवर लोकलचा डबा घसरला. त्यामुळे हार्बर लाईन ठप्प झालीये. ऐन संध्याकाळी वाहतूक कोंडी झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहे. वाहतूक सुरळीत करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पण या कामाला अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेच्या हार्बर लाईनवर आज संध्याकाळी 6.55 वा. दरम्यान वांद्रे वरुन सीएसटीकडे येणारी अप हार्बर लोकल सीएसटीजवळ रूळावरून घसरली. या लोकलचा 2 डब्बा रूळावरून घसरला. त्यामुळं प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2 आणि 3 वरून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली. हार्बरच्या प्रवाशांना सेंट्रलनं जाण्याची परवानगी देण्यात आलीये. लोकल सुरळीत होण्यासाठी अजून काही वेळ लागणार आहे. ऐक गर्दीच्या वेळी लोकल बिघडल्यानं प्रवाशांचे अतोनात हाल झाले. वडाळ्यापासून डाऊन मार्गावरची वाहतूक सुरू आहे.

वडाळा ते पनवेल आणि वडाळ्यावरून अंधेरीपर्यंतची सेवा सुरू आहे. पण, सीएसटीहुन वडाळ्यापर्यंत वाहतूक ठप्प झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2015 08:46 PM IST

ताज्या बातम्या