सिंचन घोटाळ्याप्रकरण : अजित पवार, तटकरेंना एसीबीकडून समन्स

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Sep 13, 2015 04:51 PM IST

ajit pawar and tatkare

13 सप्टेंबर : सिंचन घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि माजी जलसिंचन मंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच एसीबीने समन्स बजावला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे अजित पवार आणि सुनील तटकरे या दोघांनाही स्वतंत्रपणे समन्स बजावण्यात आला आहे. सुनील तटकरेंना 15 सप्टेंबर तर अजित पवारांना 16 सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दोघांनी हजेरी न लावल्यास कायदेशीर पावलं उचलण्यात येतील अशीही माहिती देण्यात आली आहे. या आधी एसीबीने महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांसह सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अभियंत्यांवर तक्रार दाखल केली होती. आता तटकरे आणि अजित पवार चौकशीला कशाप्रकारे सामोरे जाणार आणि या चौकशीतून नेमकं काय सत्य बाहेर येतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2015 04:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...