शाहीस्नानासाठी आलेल्या तीन भाविकांचा अपघाती मृत्यू

शाहीस्नानासाठी आलेल्या तीन भाविकांचा अपघाती मृत्यू

  • Share this:

nashik accideny

13 सप्टेंबर : नाशिकमध्ये कुंभमेळ्यातल्या शाहीस्नानाच्या दुसर्‍या पर्वणीला आज (रविवारी) एका अपघातामुळे गालबोट लागलं. नाशिक पेठ रस्त्यावर रविवारी दुपारी कार आणि टेम्पोच्या धडकेत तीन भाविकांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झालं. हे सर्वजण सिल्व्हासामध्ये राहणारे आहेत.

कुंभमेळ्यातल्या दुसऱया शाहीस्नानासाठी हे भाविक नाशिकला आले होते. स्नान आटोपल्यावर नाशिक पेठ रस्त्यावरून जात असताना समोरून आलेल्या एका दुचाकीला होणारी धडक टाळण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गाडीची टेम्पोला धडक झाली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले. गोविंदराम पारीख (30), विकी पारीख (10), श्रावणकुमार (32) अशी मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची नावं आहेत. तर जखमींवर नाशिकमधल्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: September 13, 2015, 2:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading