येत्या 24 तासांत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊसच पाऊस !

  • Share this:

rain in vardha3412 सप्टेंबर : दुष्काळाने होरपळणार्‍या महाराष्ट्राला परतीच्या पावसाने गारेगार दिलासा दिलाय. आज बैल पोळ्याच्या दिवशी राज्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. कुठे ना कुठे हा सर्वांसाठीच एक चांगला संदेश आहे. त्यामुळे परतीचा पाऊस आपल्यालाही सुखावू शकेल अशी आशा प्रत्येकालाच वाटू लागलीय. येत्या 24 तासांत संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असेल आणि सर्वदूर पाऊस पडले असा अंदाज हवामान खात्याच्या वतीनं वर्तवण्यात आलाय. येवल्याप्रमाणे नाशिक, पुणे, धुळे या भागातही चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. कोकण, गोवा आणि मराठवाड्यात सुद्धा काही भागात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

येवल्यात जोरदार हजेरी

राज्याच्या अनेक भागात आजही परतीच्या पावसानं हजेरी लावलीय. नाशिकच्या येवल्यात परतीच्या पावसाचे जोरदारने जोरदार हजेरी लावलीये. सुमारे 1 तास मुसळधार पाऊस झाला. पोळयाच्या दिवशी जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी काहीसा सुखावलाय. विशेष म्हणजे, पाऊस पडावा यासाठी मनमाडला हजारो मुस्लिम बांधवानी गावाबाहेर जाऊन सामूहिक नमाज पठन केले होतं.

नगरमध्ये सर्वदूर पाऊस

अहमदनगर जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला. नगर शहर, जामखेड, पाथर्डी, राहता, अकोले, शिर्डी, लोणी, राहुरी, कोपरगावला मुसळधार पाऊस पडलाय. तसंच श्रीरामपूर तालुक्यातील भोकर, खोकर, वडाळामहादेव, टाकळीभान, घुमनदेव, मुठेवाडगाव परीसरातही पावसाची संततधार सुरू होती. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात कमी जास्त पाऊस पडतोय.

गेल्या 24 तासात कोपरगावाला सर्वाधिक 40 मिमी, अकोल्यात 32 मिमी, जामखेडला 31 मिमी तर संगमनेरला 24 मिमी पाऊस पडलाय. पावसामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. या पावसामुळे अनेक ठिकाणच्या ओढ्या- नाल्यातून पाणी वाहू लागलंय.

जलयुक्त शिवार योजनांतही पाणी साचल्यानं शेतकरर्‍यांना काहीसा दिलासा मिळालाय. या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. अजून पावसात वाढ झाल्यास रब्बीच्या पेरण्यानाही सुरुवात होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2015 08:17 PM IST

ताज्या बातम्या