कुंभमेळ्यात दुसर्‍या शाही स्नानाचं पर्व तीन दिवस

कुंभमेळ्यात दुसर्‍या शाही स्नानाचं पर्व तीन दिवस

  • Share this:

nashik_kumbha (3)12 सप्टेंबर : कुंभमेळ्यात दुसर्‍या शाही स्नानासाठीचं पर्व हे 72 तासांचं म्हणजे तीन दिवसांचं असणार आहे. त्यामुळं ज्या भाविकांना शाही स्नान हे रामकुंडातच करण्याची इच्छा आहे त्यांनी या 72 तासांत टप्याटप्यानं येऊन स्नान करण्याचं आवाहन नाशिक पुरोहीत संघानं केलंय.

12 तारखेला म्हणजे आजच श्रावण अमावस्या सुरू होतेय, आणि श्रावण अमावस्या शाही स्नानासाठी सर्वात उत्तम आणि महत्वाचा मुहूर्त मानला जातो. साधू महंतांच्या शाही स्नानाचा मुहूर्त 13 सप्टेंबरला असला तरीही आज सकाळी 10 वाजेपासून 14 तारखेच्या संध्याकाळपर्यंत शाही स्नानाचं पर्व आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: September 12, 2015, 7:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading