IBN लोकमत इम्पॅक्ट : परभणीत गढूळ पाणीपुरवठादारावर गुन्हा दाखल

  • Share this:

parbhani water311 सप्टेंबर : परभणीमधील काही गावात टॅकर्सद्वारे गढूळ पाण्याचा पुरवठा होतं असल्याचं धक्कादायक वास्तव आयबीएन लोकमतने दाखवलं होतं. या बातमीनंतर प्रशासनाला जाग आलीये. या प्रकरणी पाणीपुरवठादार आणि टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

आज सकाळीच लाल तांडा या गावात सकाळी निवासी उपजिल्हाधिकारी,तहसीलदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि अधिकार्‍याचा फौजफाटा दाखल झाला. या टँकरच्या पुरवठादारावर आणि चालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. अधिकार्‍यांनी गावातील हॅन्डपंपमधील पाण्याची पाहणीसुद्धा केली. याच परिसरातील 2 विहिरी अधिग्रहित करून इथल्या पाण्याच्या प्रश्न मार्गी लावण्यात आलाय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2015 09:04 PM IST

ताज्या बातम्या