उद्धव ठाकरेंचा आजचा उस्मानाबाद दौरा रद्द

  • Share this:

uddhav4343411 सप्टेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाड्याचा दुष्काळ दौरा करणार होते. मात्रं हा दौरा आता रद्द करण्यात आला आहे. दौरा रद्द होण्याचं कारण अजून अस्पष्ट आहे.

उद्धव ठाकरे शिवसेनेच्या 9 मंत्र्यांसह आज सकाळी 11वाजता उस्मानाबादच्या दौर्‍यावर जाणार होते. तिथल्या दुष्काळाची पाहणी करून दुष्काळग्रस्तांसाठी मदत जाहीर करणार अशी अपेक्षा होती. तर दुपारी हतलाईदेवी मंगल कार्यालयात शेतकर्‍यांना मदतीचं वाटप करणार होते. पण आता हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

दरम्यान, उस्मानाबादचा दौरा रद्द झाला असला तरी उद्धव ठाकरे उद्या औरंगाबादला जाऊन पाहणी करण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2015 09:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading