उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या मागणीसाठी वकिलांचा कोल्हापूर बंद

उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या मागणीसाठी वकिलांचा कोल्हापूर बंद

  • Share this:

KOLBAND

10 सप्टेंबर : कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या मागणीसाठी आज वकिलांनी आजपासून तीन दिवसांच्या बंद पुकारला आहे. या बंदला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला असून पहिल्या दिवशी या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं या मागणीसाठी 6 जिल्ह्यातले वकिल गेल्या 30 वर्षांपासून लढा देताहेत. पण मागणी अजून पूर्ण झालेली नाही. गेल्या आठवड्यात मुख्य न्यायाधीश मोहित शहा हे खंडपीठ स्थापनेचा निर्णय सकारात्मक असल्याचं वकिलांना पण 2 दिवसांपूर्वीच शहा हे निवृत्त झाल्यानं पुन्हा हा प्रश्न प्रलंबितच राहिला आहे. याचा निषेध म्हणून वकील संघटनेने 3 दिवस न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.

खंडपीठ कृती समितीच्या या आंदोलनात कोल्हापूरसह सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हयातील वकील सहभागी झाले आहेत. तर या आंदोलनाला सर्वस्तरातून मोठा पाठिंबा दिला जात आहे. या आंदोलनामुळे आठ हजार खटल्याचं कामकाज ठप्प झाले आहे. तर जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर बार असोसिएशन, खंडपीठ कृती समिती, पक्षकार यांनी खंडपीठाच्या मागणीसाठी निदर्शने केली जात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2015 02:21 PM IST

ताज्या बातम्या