09 सप्टेंबर : अव्वल मानांकित टेनिसपटू सेरेना विल्यम्सने तिची बहिण व्हिनसला पराभवाची धूळ चारून युएस ओपन टेनिस स्पर्धेच्या सेमीफायनल धडक मारली आहे.
सेरेना हिने व्हिनसचा 6-2, 1-6, 6-3 असा पराभव केला. सेमीफायनलमध्ये सेरेनाची लढत इटलीच्या रॉबर्ट विन्सी हिच्यासोबत आहे. सेरेनाने यूएस ओपन जिंकल्यास या वर्षीच्या सर्व ग्रँड स्लॅम जिंकण्याचा विक्रम तिच्या नावावर नोंदला जाईल. त्यामुळे उपांत्य फेरीची लढत सेरेनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |