राकेश मारियांची अचानक बदली का झाली असावी ?

राकेश मारियांची अचानक बदली का झाली असावी ?

  • Share this:

rakesh mariya_44408 सप्टेंबर : मुंबईचे सुपर कॉप राकेश मारिया यांच्या अचानक बदलीमुळे एकच खळबळ उडालीये. शीना बोरा हत्या प्रकरणी सखोल चौकशी, पीटर मुखर्जी यांच्या संपत्तीची चौकशी एवढं सगळं सुरू असताना अचानक राकेश मारिया यांना पदावरून हटवण्यात आलं. त्यांची नियुक्ती होमगार्डच्या पोलीस महासंचालकपदी करण्यात आलीये. 30 सप्टेंबरला मारिया आयुक्तपदावरून पायउतार होणार होते पण त्याअगोदर बदली करण्यात आली. पाहुया मारियांची बदली का करण्यात आली असावी ?

शीना बोरा हत्येप्रकरणात जातीने लक्ष

शीना बोरा हत्या प्रकरण उजेडात आल्यानंतर राकेश मारिया चांगलेच सक्रीय झाले. मारिया यांनी स्वता: चौकशीचे सूत्र हाती घेतले. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या वेळी राकेश मारिया कित्येक दिवस पोलीस स्टेशनमध्ये मुक्काम ठोकून होते. त्याचप्रकारे मारिया शीना बोरा प्रकरणात चौकशी करत होते. मारिया स्वता: आरोपींची चौकशी करत होते. त्यामुळे मारिया यांना या प्रकरणात स्वता: आरोपींची चौकशी करण्याची गरज का पडली. इतर केस प्रमाणे मारियांनी याकडे लक्ष का दिलं नाही ?

खास अधिकार्‍यांवर जबाबदारी

मारियांनी शीना बोरा प्रकरणाची केस आपल्या खास विश्वासू अधिकार्‍यांवर सोपवली. खार पोलीस स्टेशनमधील एसीपी संजय कदम, खार स्टेशन इन्स्पेक्टर आणि शीना बोरा प्रकरणाचे तपास अधिकारी दिनेश कदम, स्टेशन इन्चार्ज दत्तारे बरगुडे, नितीन अलकनुरे, केदार पवार आणि ज्ञानेश्वर गनोरे हे अधिकारी मारियांच्या जवळचे मानले जातात. हे सगळे अधिकारी शीना बोरा प्रकरणाची चौकशी करत होते. त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो की, एकाच वेळी एवढ्या मोठ्या टीमची आवश्यकता होती का ?, पूर्ण पोलीस टीमची एका केसमध्ये नियुक्ती करणं कितीपत योग्य होतं ?

क्राईम ब्रँचकडे केस का नाही ?

या अगोदर अशा हायप्रोफाईल असो अथवा कोणतीही अवघड केस ती क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात यायची. अशा केसचा छडा लावण्यात क्राईम ब्रँचचा हातखंडा आहे. पण, शीना बोरा प्रकरण हे क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आलं नाही. मारिया यांनी ही केस खार पोलीस स्टेशनपर्यंतच ठेवली. या मागे काय कारण होतं ?, क्राईम ब्रँचकडे ही केस का सोपवण्यात आली नाही ?

पोलिसांच्या हाती काहीच नाही ?

शीना बोरा प्रकरणात पोलिसांनी रान उठवले. प्रत्येक बाजूचा सखोल तपास केला. पण हाती मात्र काहीच लागलं नाही. अजूनही पोलीस पुरावे गोळा करत आहे. पोलिसांनी या प्रकरणावर कोणताही खुलासा केला नाही. त्यामुळे या प्रकरणी पोलीस रस का दाखवताय ?

मीडियापर्यंत बातम्या कशा पोहचल्या ?

शीना बोरा प्रकरणाचा धक्कादायक खुलासा होताच मीडियाने या प्रकरणाचं पुरेपुरं कव्हरेज केलं. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीवरून रोज नवेनवे खुलासे करण्यात अ ाले. सूत्रांना ही माहिती पोलिसांनीच पुरवली. मग, असं होतं तर मीडियापर्यंत बातम्या का पुरवण्यात आल्यात. दरम्यानच्या काळात स्वता: राकेश मारियांनी एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत देऊन 30 सप्टेंबरपर्यंत या प्रकरणाचा छडा लावणार असा दावा केला होता. एवढंच नाहीतर शीनाची 'आरुषी' होऊ देणार नाही असं मारिया म्हणाले होते.

ललित मोदींसोबत मारिया दिसले

ललितगेट प्रकरणात राकेश मारिया यांचं नाव समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मारियांनी लंडनमध्ये ललित मोदी यांची भेट घेतल्याचं समोर आलं होतं. त्यावेळीच मारिया अडचणीत आले होते. पण, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण मागवून घेतं मारियांना अभय दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: September 8, 2015, 8:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading