हंडी लागली, पण गोविंदा काही थर लावेना !

हंडी लागली, पण गोविंदा काही थर लावेना !

  • Share this:

dahi handi 434405 सप्टेंबर : दहीहंडीचा उत्सव उद्यावर येऊन ठेपला असतानाही गोविंदा पथकांना अजूनही नियमावली मिळालेली नाहीये. दहीहंडी फोडणारी गोविंदा पथकं त्यामुळे संभ्रमात आहेत. पोलिसांनी गोविंदा पथकांना दिलेल्या पत्रकात 18 वर्षांखालच्या मुलांना सहभागी होता येणार नसल्याचं म्हटलंय. आणि त्याच पत्रकात 12 ते 15 वर्षं वयाच्या मुलांना आपल्या पालकांचे संमती पत्र बरोबर ठेवावं लागणार असंही म्हटलंय. बाल हक्क आयोगाच्या आदेशाने 12 वर्षांखालच्या मुलांना भाग घेता येणार नसल्याचं नमुद केलंय.

गेल्या काही वर्ष्यात दहिहंदीच परंपरागत स्वरुप लुप्त झालंय. दहिहंडीकडे एक इव्हेंट म्हणून पाहण्याचा दृष्टिकोण तयार झाला आहे. दहीहंडी सणचा राजकारण्यांनी बखुबीने उपयोग करून घेतला आणि स्वता:च्या प्रतिष्ठानच्या नावाने प्रायोजक जमा करून लाखो रुपयांच्या घरात बक्षिसांची खैरात ठेवली. यात मग गोविंदपथक भाग घेऊ लागले आणि यात अनेक गोविंदांचे जिव गेले तर काहीजण जायबंदी झाले. मागील वर्षी बारा वर्षांखालील मुलांना दहीहंडी उत्सवात सहभागी होता येणार नाही असा आदेश बाल हक्क आयोगाने काढला होता, यावर उपाय म्हणून या वर्षी या दहीहंडी मंडळाला साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला मात्र न्यायालयाच्या आदेश नुसार खेळाडूना वयाचे बंधन घालण्यात आले. पोलिसांनी गोविंदा पथकाना दिलेल्या पत्रकात उच्च न्यायालयाच्या आदेशाने 18 वर्षांखालील मुलांना सहभागी होता येणार नसल्याचे म्हटलं आहे आणि त्याच पत्रकात तर 12 ते 15 वषांर्च्या वयाच्या मुलांना आपल्या पालकांचे संमती पत्र सोबत ठेवावे लागणार आहे. तर शेवटी बाल हक्क आयोगाच्या आदेशाने 12 वर्षांखालील मुलांना भाग घेता येणार नसल्याचे नमूद केले आहे त्यामुळे गोपाळकाला मंडळे संमभ्रात आहेत .

मुंबई पोलीस ही या उत्सवात सहभागी होण्यासाठी तयारीत आहेत. मुंबई पोलिसांनी सर्व मंडळांना सुरक्षेची काळजी घेण्याचे आव्हान केले आहे. 2 ते 15 वर्षं वयाच्या मुलांना आपल्या पालकांचे संमती पत्र सोबत ठेवल्यास दही हंडी उत्सवात सहभागी होता येणार आहे मात्र दही हंडीच्या थरा बाबत मात्र कोणीच बोलत नाही.

पोलिसांनी दिलेल्या पत्रकात तीन वेगवेगळ्या सूचना असल्याने मंडळात संभ्रम आहे. तर नेहमी प्रमाणे पोलीस आणि प्रशासन आपले काहीही करू शकत नाही अशा भ्रमात आयोजक आहेत. न्यायालयाच्या आदेशाबाबत सरकारच्या निर्णयाबाबत अजूनही स्पष्टता नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: September 5, 2015, 5:02 PM IST

ताज्या बातम्या