05 सप्टेंबर : आज रात्री उशिराने प्रवास करणार असला तर मुंबईकरांना एक सुचना...आज रात्री मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक आहे. सीएसटीहून शेवटची गाडी रात्री 12वाजून 10 मिनिटांनी सुटणार आहे. त्यानंतरच्या सर्व गाड्या दादरहून सोडण्यात येतील.
शेवटची दादर कर्जत गाडी 12 वाजून 48 मिनिटांनी सुटेल. मोनोरेलच्या दुसर्या टप्प्याच्या बांधाकामासाठी परळ ते करी रोडदरम्यान मध्य रेल्वेवर काम सुरू आहे. त्यासाठी हा विशेष ब्लॉक आहे.
रात्री साडेबारा ते पहाटे साडेपाच पर्यंत दादर ते सीएसटी मध्य रेल्वेची वाहतूक बंद राहणार आहे. जम्बो ब्लॉकनंतर सीएसटीहून पहिली गाडी रविवारी पहाटे 5.48 ला कसार्याला सुटणार आहे.
मध्य रेल्वेवर आज विशेष ब्लॉक
- रात्री 12.30 ची सीएसटी-कर्जत दादरहून रात्री 12.48 वा. निघेल
- सीएसटीहून कसार्याला शेवटची गाडी रात्री 12.10 वा.
- रविवारी पहाटे 4.12 कसारा, 4.25 खोपोली, 4.50 कर्जत, 5.02 कसारा गाड्या दादरहुन सुटतील
- 5.14ची आसनगाव गाडी कुर्ल्याहुन सुटेल
- रविवारी सकाळी सीएसटीहुन पहिली गाडी 5.48 वा. अंबरनाथसाठी सुटेल
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |