भारताचा लंकेवर 'विराट' विजय, 22 वर्षांनंतर टेस्ट सीरिज जिंकली

भारताचा लंकेवर 'विराट' विजय, 22 वर्षांनंतर टेस्ट सीरिज जिंकली

  • Share this:

indsl01 सप्टेंबर : श्रीलंकेचा डंका वाजवत भारताने तब्बल 22 वर्षांनंतर विजयाला गवसणी घातलीये. भारतीय टीमनं अखेर 22 वर्षांनंतर श्रीलंकेमध्ये टेस्ट सीरिज जिंकली आहे. कोलंबो टेस्ट जिंकत भारतानं 2-1 नं सीरिज जिंकली आहे. कोलंबो टेस्टमध्ये भारतानं लंकेचा 117 रन्सनी पराभव केलाय. ईशांत शर्मानं आठ विकेट घेत या मॅचमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. तर पहिल्या इनिंगमध्ये चेतेश्वर पुजाराची सेंच्युरीही महत्त्वाची ठरली होती. चेतेश्वर पुजारा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. तर सीरिजमध्ये 21 विकेट्स घेणारा रविचंद्रन अश्विन मॅन ऑफ द सीरिज ठरलाय.

श्रीलंकेविरुद्ध तिसर्‍या आणि अखेरच्या टेस्टमध्ये भारताने लंकेसमोर विजयासाठी 386 रन्सचे लक्ष्य ठेवले होते. 386 धावांचा पाठलाग करणारी लंकनं टीम 268 रन्सवर गारद झाली. लंकेकडून कप्तान एंजेलो मैथ्यूजने एकाकी झुंज दिली पण ती अपयशी ठरली. ईशांत शर्माने मैथ्यूजला 110 रन्सवर आऊट करत पव्हेलियनचा रस्ता दाखवला. सहाव्या विकेटसाठी मैथ्यूज आणि कुशल परेरा ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरली. पण 77 व्या ओव्हरमध्ये अश्विनने परेराला आऊट केलं आणि जोडी फोडली. श्रीलंकेची अवस्था 6 विकेटवर 242 अशी झाली होती. यानंतर हेराथने चहापानापर्यंत लंकेची बाजू सांभाळली. चहापानानंतर खेळाला सुरूवात होताच ईशांतने मैथ्यूजची विकेट घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर 84 व्या ओव्हरमध्ये अश्विनने हेराथला आऊट केलं. भारतीय बॉलर्सच्या भेदक मार्‍यापुढे लंकनं टीम घायाळ झाली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या यंग ब्रिगेडने तब्बल 22 वर्षांतर लंकेत टेस्ट सीरिज जिंकण्याचा पराक्रम गाजवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2015 04:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading