टॅक्सीचालकांच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल

टॅक्सीचालकांच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल

  • Share this:

afsadortjeiosy

01 सप्टेंबर : मुंबईत आज सकाळीपासूनच चाकरमान्यांचे हाल होतायेत कारण काही टॅक्सी युनियनचा संप पुकारला आहे. उबेर, ओला या सारख्या खासगी टॅक्सी विरोधात स्वाभिमान संघटनेच्या टॅक्सीचालकांनी मंगळवारी संप पुकारला आहे. त्याला मनसे आणि रिपब्लिकन युनियनने पाठिंबा दिला आहे.

उबेर, ओला या खासगी टॅक्सी सेवा पुरवणार्‍यांनी आपल्या दरात कपात केल्यामुळे इतर टॅक्सीचालक संतप्त झाले आहेत. त्याविरोधात या संघटनेने संप पुकारला आहे. दादर, परळ, सीएसटी, चर्चगेट, नरिमन पॉईंट भायखळा, ग्रँट रोड परिसरात सर्वसामान्यांवर संपाचा परिणाम होताना दिसत आहे.

दरम्यान, मुंबईतील इतर टॅक्सी संघटना या संपात सहभागी झाल्या नसून ते त्यांचं काम सुरळीतपणे करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण काही भागांमध्ये स्वाभिमान संघटनेचे टॅक्सीचालक इतर टॅक्सीचालकांनाही या संपात सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केल्याची माहिती मिळते आहे. काही ठिकाणी संघटनेचे कार्यकर्ते गाड्यांच्या काचा फोडण्याच्या धमक्या देऊन, टॅक्सी बंद पाडण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे टॅक्सीचं नुकसान होऊ नये या भीतीने, बर्‍याच टॅक्सीचालकांनी आपलं काम थांबवलं आहे. या संपामुळे नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांचे हाल होतायेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2015 10:11 AM IST

ताज्या बातम्या